Chhagan Bhujbal : भुजबळांनी भरली साडेसहा कोटीची थकबाकी; काय आहे प्रकरण?

Dues Paid by Chhagan Bhujbal : तसेच समान चार हप्त्यांमध्ये उर्वरित 26 कोटींची रक्कम फेडायची आहे. त्याच अनुषंगाने 6 कोटी 50 लाखांचा पहिला हप्ता कंपनीने बँकेस दिला आहे. मात्र अजून 26 कोटींची रक्कम भरायची बाकी आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalYandex

तबरेज शेख

Armstrong Infrastructure Private Limited :

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा बँकेची साडेसहा कोटींची थकबाकी भुजबळांनी भरली आहे.

Chhagan Bhujbal
Hemant Godse यांचा पत्ता कट? Chhagan Bhujbal लोकसभा लढवणार? | Marathi News

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळांच्या मालकीच्या या कारखान्याकडे 51 कोटी 66 लाखांची थकबाकी आहे. या कारखान्याचे संचालक छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीसीनंतर भुजबळ कुटुंबीयाने जिल्हा बँकेकडून वन टाइम सेटलमेंट योजनेतून थकबाकी भरण्यासाठी अर्ज केला होता.

कारखान्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 कोटीचे कर्ज दिले होते. समान चार हप्त्यात परतफेड, कर्जाच्या वाढत्या थकबाकीमुळे काही वर्ष आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकेने वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. याच पार्श्वभूमीवर आर्मस्ट्राँग कारखान्याकडील 52 कोटींच्या थकबाकी पैकी निम्मी रक्कम माफ करण्यात आली आहे.

तसेच समान चार हप्त्यांमध्ये उर्वरित 26 कोटींची रक्कम फेडायची आहे. त्याच अनुषंगाने 6 कोटी 50 लाखांचा पहिला हप्ता कंपनीने बँकेस दिला आहे. मात्र अजून 26 कोटींची रक्कम भरायची बाकी आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.

Chhagan Bhujbal
Chhgan Bhujhbal | कधी काय करायचं ते Sharad Pawar यांना चांगलं कळतं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com