Hingoli Crime News: दारुड्या मुलाने बापासमोरच आईसोबत केलं भयंकर कृत्य, ऐकून तुमचाही राग होईल अनावर

Hingoli Police: याप्रकरणी हिंगोलीच्या करमनुरी पोलिसांनी (Hingoli Police) नराधम मुलाला अटक केली.
Hingoli Crime News
Hingoli Crime NewsSaam Tv News

संदीप नागरे, हिंगोली

Hingoli Latest News : हिंगोलीमध्ये (Hingoli) नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका दारुड्या मुलाने आपल्या आईवर बलात्कार (physically assaulted) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांचे हातपाय बांधून या मुलाने आईवर बलात्कार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंगोलीच्या करमनुरी पोलिसांनी (Hingoli Police) नराधम मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Hingoli Crime News
PM Modi Papua New Guinea Visit: ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, ते गरजेच्या वेळी आले नाही: पंतप्रधान मोदी

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात ही घटना घडली आहे. आरोपी दारु पिऊन आपल्या आई-वडिलांना नेहमी त्रास द्यायचा. रविवारी मध्यरात्री आरोपीने जे कृत्य केलं ते ऐकून सर्वांना मोठा हादरला बसला आहे. रात्रीच्या वेळी आई-वडील झोपल्यानंतर आरोपी नेहमीप्रमाणे मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याने आई-वडिलांकडे दारुसाठी पैसे मागितले. पैसे देत नसल्यामुळे त्याने भांडण केले.

दारुसाठी पैसे देत नसल्याने आरोपीला खूपच राग आला. रागाच्या भरात त्याने आईसोबत धक्कादायक कृत्य केले. त्याने आपल्या वडिलांचे हात पाय बांधत 54 वर्षीय आईवर बलात्कार केला. जन्मदात्या आईवर संतोष अत्याचार करत असल्याचे पाहून वडिलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. मात्र संतोष वडिलांना मारहाण करत असल्याने ते देखील शांत राहिले.

Hingoli Crime News
Sameer Wankhede Expressed Fear: अतीक अहमदसारखा माझ्यावर हल्ला होऊ शकतो, समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

अखेर सकाळ झाल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार या पती-पत्नींनी गावातील ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून आरोपी मुलगाविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या नराधम मुलाला तात्काळ अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरला आहे. जन्मदात्या आईसोबत सैतानी कृत्य करणाऱ्या आरोपी मुलाला कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com