Drought News : राज्यातील दुष्काळाची व्याप्ती वाढली; दुष्काळग्रस्त भागात आणखी 224 महसूल मंडळांचा समावेश, काय फायदे मिळणार?

Maharashtra Drought News : पूर्वीच्या महसूल मंडळांच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या आणि कमी पाऊस पडलेल्या दुष्काळग्रस्त भागात 224 महसूल मंडळांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
drought
drought saam tv
Published On

Mumbai News :

राज्यातील दुष्काळाची व्याप्ती हळूहळू वाढू लागली आहे. राज्य सरकारने आणखी 224 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे. गेल्या वर्षी या भागात पावसाचं प्रमाण सरासरीच्या 75 टक्के पेक्षा कमी असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशारितीने राज्यातील 2292 महसूल मंडळापैकी 1532 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील 2292 महसूल मंडळांपैकी 2068 मध्ये परिसरातील पाऊस मोजण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 356 पैकी 40 तहसीलमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. ज्यामध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 287 महसूल मंडळांचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

drought
Indapur Politics: इंदापुरात पुन्हा पाटील विरुद्ध पवार संघर्ष! लोकसभा निवडणुकीवरून अंकिता पाटलांचा थेट अजित पवारांना इशारा

त्यानंतर सर्वपक्षीय आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये 1021 अतिरिक्त महसूल मंडळांचा समावेश करून दुष्काळग्रस्त भागांचा विस्तार केला. आता 16 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने आणखी 224 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश केला आहे.

स्वयंचलित हवामान केंद्र नसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यामुळे पूर्वीच्या महसूल मंडळांच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या आणि कमी पाऊस पडलेल्या दुष्काळग्रस्त भागात 224 महसूल मंडळांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

drought
Cold Wave In Mumbai : मुंबईकरांना पुन्हा येणार गुलाबी थंडीचा अनुभव, किमान तापमान १५ अंशांनी खाली जाणार

काय फायदे मिळतील?

या सर्व 224 दुष्काळग्रस्त भागांना शेतकऱ्यांना वीज बिलात 33.5 टक्के सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसुलीला स्थगिती इत्यादी फायदे मिळतील. दुष्काळी महसुली मंडळांची संख्या आता 1532 झाली आहे. 224 महसूल मंडळे विविध 19 जिल्ह्यांतील असून त्यापैकी 17 जिल्हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दोन जिल्हे विदर्भातील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com