नमाज पडतानाच पडला बॉम्ब, क्षणातच मशिद झाली कब्रस्तान

Drone Bombing During Morning Prayer Kills 75 Innocents: देवाचं नाव घेण्यासाठी जमलेल्या निष्पापांच्या मृत्यूनं खळबळ माजलीये.. एका क्षणात 75 लोक मारली गेली. बॉम्ब हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करुन ही दहशत माजवण्यात आली.
Sudan mosque destroyed after deadly drone strike during morning prayers, with rescue teams searching through the rubble for survivors.
Sudan mosque destroyed after deadly drone strike during morning prayers, with rescue teams searching through the rubble for survivors.Saam Tv
Published On

गेल्या दोन वर्षांपासून युक्रेन - रशिया युध्द सुरू आहे आणि या दरम्यान जगभरात युद्धाचे नियम बदलू लागलेत. आता युद्ध सीमेवर नाही तर नागरी भागात केलं जातंय... इराण-इस्त्राईल युद्ध दरम्यानही त्याची प्रचिती आली आहे. सैनिकच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकांचा बळी जातोय ... होय जागतिक युद्ध नियमांना फाटा देत देवाचं नाव घेण्यासाठी जमलेल्या निष्पाप नागरिकांना बॉम्बनं उडवून देण्यात आलंय. यात एक दोन नाही तर जवळजवळ लहान मोठ्यांसह 70 ते 75 जणांचा मृत्यू झालाय. सुदानमधील ही धक्कादायक घटना आहे.

दिनांक

19 सप्टेंबर 2025

वेळ

सकाळच्या नमाजची

सकाळच्या नमाजवेळी मशिदीवर ड्रोन हल्ला

एल फशर शहरातील मशिद क्षणात उद्धवस्त

ड्रोन बॉम्बस्फोटात 70 ते 75 लोकांचा मृत्यू

आरसीएफ नावाच्या अर्धसैनिक गटाचा हल्ला

सूदान गेल्या काही वर्षांपासून गृहयुद्धानं संकटात आहे. सरकारी सैन्य आणि RSF यांच्यात सत्तेसाठी युद्ध सुरूये. आणि याच युद्धानं नागरिकांचे बळी घेतल्यानं युद्ध गुन्हा केलाय. संयुक्त राष्ट्र आणि जागतिक मानवाधिकार संघटनांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. कारण मशिद पुर्ण बेचिराख झाली असून ढिगारा हटवून रेस्क्यू करण्याचं काम सुरुये. त्यामुळे हे युद्ध कधी थांबणार आणि सोनं पिकवणाऱ्या या देशाला कधी सोन्याचे दिवस येणार हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com