पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; थोडक्यात बचावले

या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; थोडक्यात बचावले
पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; थोडक्यात बचावलेसुरेंद्र रामटेके
Published On

सुरेंद्र रामटेके

वर्धा - पुलावरून पाणी वाहत असताना वाट काढू नये, अस आवाहन वेळोवेळी केलं जातं पण अनेक जण  त्याकडे दुर्लक्ष करत बिनकामाच धाडस करतात.मग हेच अस धाडस अपघातालाही निमंत्रण देत...असाच प्रकार समुद्रपूर Samudrapur तालुक्यातील पिपरी Piprai परिसरात घडला आहे. सुदैवाने उपस्थित युवकांनी वेळीच मदतीला धावून पुरात Flood वाहून जाणाऱ्याला वाचवलं. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल Video Viral झाला आहे.

हे देखील पहा -

समुद्रपूर तालुक्यातील  पिपरी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होत. दरम्यान एक जण दुचाकी चालवत पुढं नेत होता तर दुसरा त्याला आधार देत होता. पण पाण्याच्या प्रवाहात अचानक दुचाकी कलंडुन वाहून जाऊ लागली. एकान दुचाकी सोडून दिली तर दुसरी व्यक्ती दुचाकी ओढण्याचा प्रयत्न करत होती.

पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; थोडक्यात बचावले
सरकारी कार्यालयात मोबाईल वापरण्यासाठी आता नवे नियम

अशात तोल गेला आणि दुसरी व्यक्ती दुचाकी सोबत वाहून जाऊ लागली. यावेळी उपस्थित युवकांनी धाव घेऊन  वाहून जाणाऱ्या व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढले. पुलावरून पाणी वाहताना असे प्रकार अपघातास निमंत्रण देणारे ठरतात.त्यामुळे काळजी घेत बिनकामाच धाडस न केलेलंच बर.

नाल्याच्या पुरातून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न अंगलट, बैलबंडीसह शेतकरी गेला वाहून

तर दुसरीकडे, तास या गावाजवळ नाल्यातील पुरातून बैलगाडी घेऊन जाण्याच्या प्रयत्न अंगलट आला आहे. नाला पार करण्याच्या प्रयत्नात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेला. घटनेत बैलगाडीसह शेतकरी संतोष शंभरकर हे वाहून गेलेत. बैल काही अंतरावर मृतावस्थेत आढळला आहे तर संतोष शंभरकर या शेतकऱ्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com