सरकारी कार्यालयात मोबाईल वापरण्यासाठी आता नवे नियम

या नव्या नियमांनंतर सरकारी अधिकारी, कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
सरकारी कार्यालयात मोबाईल वापरण्यासाठी आता नवे नियम
सरकारी कार्यालयात मोबाईल वापरण्यासाठी आता नवे नियमSaam Tv
Published On

औरंगाबाद - सध्या सहजरित्या आणि वेगाने संवाद साधण्यासाठी दृकश्राव्य माध्यम म्हणून प्रत्येकाच्या हातात मोबाईल Mobile आहे. 'मोबाईलशिवाय काम' असा जरी विचार केला तर 'कसं शक्य' असं सहजपणे बोलून जातो. पण राज्य सरकारच्या State Government सामान्य प्रशासनाने, मोबाईल वापरताय... जरा 'नियमात'... अशा आशयाचे परिपत्रक काढून राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल वापराबाबत नवा शिष्टाचार आणि नियम घालून दिले आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून मोबाईलचा वापर करताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले असून अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते म्हणून शासकीय कामकाज करताना मोबाईलच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत सूचना देण्यात येत असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या नव्या नियमांनंतर सरकारी अधिकारी, कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

हे देखील पहा -

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात येताना कोणती कपडे घालावेत याबाबत सूचना केल्या होत्या, त्यावर काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानं वाद निर्माण झाला होता. आता या मोबाइल वापराबाबत नवे नियम आणि शिष्टाचार लागू केल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटेल, यावर या नव्या नियमांचं भवितव्य असेल. राज्यात जवळपास सव्वा लाख राज्य सरकारी कर्मचारी-अधिकारी आहेत.

सरकारी कार्यालयात मोबाईल वापरण्यासाठी आता नवे नियम
अमरावतीकरांच 'चिअर फॉर इंडिया; ऑलिम्पिक खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा

काय आहेत नियम :

१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.
२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.
३. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
४. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये आणि असंसदीय भाषेचा वापर करू नये.
५. कार्यालयीन साठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.
६. भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.
७. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.
८. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.
९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent / vibrate mode वर ठेवावा. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.५६/१८ (र.वा.) १०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, ear piece / ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात.
११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com