नाशिक : उत्तर प्रदेश UP मधील लखीमपूर Lakhimpur दुर्घटनेवरती देशातील सर्वच विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. लखीमपूर मधील घटनेला भाजपच BJP जबाबदार असून आता भाजपच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग पेठून उठला असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील JayantPatil यांनी केलं असतानाच याच घटनेवरुन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी या लखीमपूर च्या प्रकरणावरून केंद्र सरकारला इशारा दिला आहे. (Don't let people take the law into their own hands; Bhujbal warns central government)
हे देखील पहा -
शेतकऱ्यांनी चिरडणाऱ्या व्यक्तींविरोधात साधा एफआयआर FIR करायला दोन दिवस लागतात, देशात कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? असा सवाल उपस्थित केला तसचं लवकरात लवकर या घटनेवरती लक्ष घालून दोषींवरती कारवाई करा अन्यथा लोकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा त्यांनी आज मोदी-योगी सरकारला दिला आहे. ते आज सप्तश्रृंग गडावरती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरिल वक्तव्यं केलं. दरम्यान राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे Heavy Rain शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे या संकटात राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या संकटातून सावरण्याचं बळ शेतकऱ्यांना मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी देवीचरणी केली असल्याचं ते म्हणाले.
तसेच आज आयकर विभागाचे छापे पडत आहेत त्यावरती भाष्य करताना भुजबळ म्हणाले भाजपचे देखील अनेक कारखाने आहेत त्यापैकी एकावर पण कारवाई नाही. असं का तसेच आधी कारवाई करायची, मीडियात मोठी प्रसिद्ध द्यायची आणि नंतर तो निर्दोष सुटतो आणि मीच या कारवाईचे उत्तम उदाहरण असल्याचही ते यावेळई म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.