अभिजित देशमुख
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफ स्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने करण्यात आलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली. काही दिवसात यांची तोडफोड सुरु झाली आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांनंतर चांगले रस्ते झाले होते. शासनाने केडीएमसी व डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्त्यांसाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीस वर्षात प्रथमच मंजूर झालेल्या या निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांची तोडफोड करण्यास सुरवात झाली आहे.
नागरिक, उद्योजक संतप्त
डोंबिवली एमआयडीसी परिसरात सेवा वाहिन्या, गटारी किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने खोदकाम सुरु करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून हा रस्ता फोडण्यास सुरवात झाली आहे. या प्रकारामुळे कधी नव्हे तो चांगला झालेला रस्ता फोडला जात असल्याने नागरिक व एमआयडीसीतील उद्योजकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कारवाईची होतेय मागणी
दरम्यान स्थानिकांनी नवीन रस्ता का फोडला जातोय? करदात्यांचा पैसा असा वाया घालवणं बंद व्हावं. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून चौकशी झाली पाहिजे; अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच केडीएमसी प्रशासन, एमआयडीसी व ठेकेदार यांच्यातील समन्वय अभावामुळे रस्त्यांचा दर्जा आणि कर दात्यांचा पैसा वाया जात असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.