Dombivli News: गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मूर्तीकार फरार; डोंबिवलीत भक्तांची धावपळ

Ganesh Idol Scam in Dombivli: डोंबिवलीतील एका मूर्तीकारानं गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच कलाकेंद्रातून पळ काढलाय. मूर्तीकार नेमरका फरार का झाला? गणेशभक्तांचं नेमकं म्हणणं काय?
Devotees in Dombivli left helpless after idol maker absconds with advance payments just before Ganeshotsav.
Devotees in Dombivli left helpless after idol maker absconds with advance payments just before Ganeshotsav.Saam Tv
Published On

आपापल्या आवडीनुसार गणरायाच्या मूर्तीचं आगाऊ बुकींग मूर्तीकारांकडे केल जातं. डोंबिवलीत ही अनेक गणेशभक्तांनी एका मूर्तीकराकडे गणपतीची आपल्या पंसंतीची मूर्ती सांगितली . मात्र ज्यावेळी ते मूर्तीकाराकडे गणेशमूर्ती घेण्यासाठी गेले तेव्हा चक्क मूर्तीकारचं मूर्तीशाळेतून पसार झाल्याचं समोर आल..

गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच मूर्तीकार मूर्तीकाम न करता पसार झाल्यानं गणेश भक्तांमध्ये संताप आहे. अनेकांनी मूर्तीची आगाऊ रक्कमही मूर्तीकाराला दिली होती. आता एेनवेळी मूर्ती घेण्यासाठी गणेशभक्तांची धावाधाव उडालीय.

दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीय. मूर्तीकारानं कमी पैशात जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि कामाचा भार वाढल्यानं मूर्तिकार पसार झाला असावा असा संशयही अनेकांनी व्यक्त केलाय.

मूर्तिकारानं आवाक्यापेक्षा जास्त काम घेतल्यामुळे हा प्रकार घडला असला तरी या घटनेमुळे मूर्तीकारांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जातोय. गणेशमूर्तींचे अर्धवट काम केल्यानं अनेकांची गैरसोय झालीय. त्यामुळे गणेश भक्तांनीही मूर्तीकारांच्या अवास्तव प्रलोभनांना भुलून न जाता.. वर्षांनुवर्ष गणेश मूर्तीचं काम करणाऱ्या आणि भक्तांना योग्य सेवा देणाऱ्या मूर्तीकारांकडूनच गणेश मूर्ती घेणं योग्य...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com