Dombivali : मद्यधुंद दुचाकीस्वाराची उभ्या कारला धडक; घटना सीसीटीव्हीत कैद

Dombivali News : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर येथील सर्व्हिस रस्त्यावर सध्या गटाराचे काम सुरू आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना आपली वाहने घरासमोरच अरुंद रस्त्यावर उभी करावी लागत आहेत
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागात गटारीचे काम आणि रस्त्यावर करण्यात आलेल्या पार्किंगमुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे अपघात वाढत असून नुकताच एका घटनेत दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हा दुचाकीस्वार मध्यधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात असून यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. 

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर येथील सर्व्हिस रस्त्यावर सध्या गटाराचे काम सुरू आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना आपली वाहने घरासमोरच अरुंद रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. हा रस्ता आधीच लहान असून कल्याण- शिळ मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे अनेक वाहन चालक या पर्यायी मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी होते. 

Dombivali News
Pimpri Chinchwad Crime : अल्पवयीन तरुणीची भररस्त्यात हत्या; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर, परप्रांतीय मामा भाचा ताब्यात

मात्र अरुंद रस्त्यामुळे अपघात देखील होत आहेत. रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांना इतर वाहन धारकांकडून धडक दिली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पार्किंगमध्ये असलेल्या वाहन धारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशाच एका अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ५ मे रोजी पहाटे तीन वाजता एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो एका पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाडीला धडकला. 

Dombivali News
Bhokardan Heavy Rain : भर उन्हाळ्यात ओढ्याना पूर; भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले

दुचाकीस्वार गंभीर जखमी 

यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान याप्रकरणी स्थानिक रहिवासी वैभव पोद्दार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांकडून तपास केला जात आहे. तर एमआयडीसी ठेकेदारांकडून गटाराचे काम तातडीने पूर्ण करावे आणि या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com