Dolby Controversy: डॉल्बीचा नाद, साताऱ्यात वाद; डॉल्बीसाठी उदयनराजे आक्रमक

Dolby Controversy : साताऱ्यामध्ये डॉल्बीमुळे वातावरण तापलंय. भर गणेशोत्सवात डॉल्बीसाठी शिमगा सुरु झालाय. जीवघेणा आवाज करणाऱ्या डॉल्बीसाठी का होतोय राजकीय संघर्ष पाहुया या रिपोर्टमध्ये.
Dolby Controversy : डॉल्बीचा नाद, साताऱ्यात वाद; डॉल्बीसाठी उदयनराजे आक्रमक
Published On

झंके, साम प्रतिनिधी

साताऱ्यात डॉल्बीमुळे यंदाही राजकीय वातावरण गरम झालंय. यावेळी थेट भाजप आणि शिंदे गटातच डॉल्बीवरून वाद पेटलाय. गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत डॉल्बीच्या दणदणाटावर पोलिसांनी निर्बंध घातल्यानंतर उदयनराजेंनी पुन्हा प्रशासनाला शिंगावर घेतलंय. कारण गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री १२ पर्यंत डॉल्बी वाजवण्यास परवानगी आहे.

मात्र खासदार उदयनराजेंनी या निर्णयाला आक्षेप घेत, थेट रात्रभर डॉल्बी वाजवण्याची परवानगी मागितली.रात्रभर मिरवणूक काढा आणि डॉल्बी वाजवा..असे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट आदेशच राजेंनी दिले.मात्र त्यांच्या या आदेशाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर नियम मोडल्यास कारवाईचा इशाराच देसाईंनी दिलाय.

Dolby Controversy : डॉल्बीचा नाद, साताऱ्यात वाद; डॉल्बीसाठी उदयनराजे आक्रमक
Kolhapur News: लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?

साता-यात डॉल्बीवरून वाद होणं नवं नाही. यापूर्वीही उदयनराजेंनी डॉल्बीच्या समर्थनात भूमिका घेतल्यामुळे वाद झाला होता. एवढंच नव्हे तर डॉल्बीमुळे अनेक दुर्घटनाही घडल्या होत्या. तरीही राजेंनी यंदा डॉल्बी रात्रभर वाजवू देण्याचा आग्रह धरलाय. डॉल्बीमुळे कोणत्या दुर्घटना घडल्या होत्या ते पाहूयात.

डॉल्बीमुळे राज्यातील दुर्घटना

साता-यात 2014 मध्ये डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

सांगली आणि पुण्यात डॉल्बीच्या आवाजानं गेल्या वर्षी दोघांचा मृत्यू.

डॉल्बीच्या दणदणामुळे गरोदर महिला, हदयरोगाच्या रुग्णांना मोठा त्रास होतो. तर

लहान मुलांच्या कानाचा पडदा फाटण्याचाही धोका असतो. असं असताना

सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले नियम पाळण्याऐवजी डॉल्बीचा कर्णकर्कष आवाजाचा हक्क का? हा प्रश्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com