Hingoli News: बापरे बाप! महिलेच्या पोटातून निघाला तब्बल ७ किलो वजनाचा गोळा; शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरही चक्रावले

7 Kg Lump: दैनंदिन व्यायाम नसल्याने व जेवणाच्या वेळा योग्य नसल्याने आपलं पोट पुढे आलं असा समाज या महिलेचा होता. मात्र तपासणीमध्ये रिपोर्ट भलताच आल्याने या महिलेसह कुटुंब देखील चिंतेत सापडलं.
Hingoli News
Hingoli NewsSaam TV
Published On

Woman Stomach Surgery:

हिंगोलीमध्ये शेतकरी महिलेच्या पोटातून ७ किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. हिंगोली शहरातील एका खाजगी रुग्णालयात या महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. संगीता शामराव इंगळे असे या महिलेचे नाव असून मागील पाच वर्षापासून या महिलेला त्रास सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Hingoli News
Women Health: मासिक पाळी आल्यास काय खाऊ नये?

हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथील त्या रहिवासी आहेत. संगीता यांना मागील काही महिन्यांपासून पोटात दुखत असल्याचं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. संगीता यांची प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना सिटीस्कॅन व एमआरआय सारख्या तपासण्या करण्यास सांगितल्या.

मात्र तपासणीमध्ये डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले. कारण या महिलेच्या पोटात तब्बल साडेसात किलोचा अनावश्यक गोळा तयार झाला होता. दैनंदिन व्यायाम नसल्याने व जेवणाच्या वेळा योग्य नसल्याने आपलं पोट पुढे आलं असा समाज या महिलेचा होता. मात्र तपासणीमध्ये रिपोर्ट भलताच आल्याने या महिलेसह कुटुंब देखील चिंतेत सापडलं.

संगीता यांच्या पोटात असलेला गोळा हा त्यांच्या जीवितवाला धोका निर्माण करणारा असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी सात वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने विशेष तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करण्यात आली होती. अखेर तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या महिलेच्या जीवाला असलेला धोका टळला आहे. डॉक्टरांनी तब्बल साडेसात किलोचा गोळा या महिलेच्या शरीराबाहेर काढला आहे.

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी मोकळा श्वास घेतला अन् डॉक्टरांचे आभार मानले. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी समाजातील महिला व पुरुषांना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले असून कुटुंबातील महिलांच्या प्रकृतीवर जास्त लक्ष द्या असे आवाहन देखील केले आहे.

Hingoli News
Crime News: आधी बहिणीला दारू पाजली, नंतर प्रियकराला रुममध्ये बोलावलं; तरुणीच्या कृत्याने पोलिसही चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com