फटाके वाजविण्यासाठी पाेलिसांनी दिली 'ही' वेळ; अन्यथा कारवाई

fire crackers
fire crackers
Published On
Summary

फटाके विक्रेत्यांनी शासनाच्या मानकाविरुद्ध असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. ऑनलाइन फटाक्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली.

अमरावती : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. स्फोटके आणि पॅकेजेसवर चिन्हांकित करण्यासंबंधी नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. फटाके Fire Crackers ताब्यात घेण्यासंबंधी आणि विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपातील व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी. ध्वनिप्रदूषण आदेशानुसार जारी केलेले निर्देश आणि निर्बंधानुसार शांतता क्षेत्रांमध्ये म्हणजे रुग्णालये, नर्सिंग होम प्राथमिक आणि जिल्हा आरोग्यकेंद्रे, शैक्षणिक संस्था या परिसरात तसेच इतर शांतता क्षेत्रामध्ये किमान शंभर मीटर अंतरावर फटाके फोडण्यास मनाई आहे. फटाके विक्रेत्यांनाही केवळ कमी उत्सर्जन करणाऱ्या फटाक्यांची विक्री करण्यास परवानगी आहे अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी दिली. Diwali Festival 2021 Diwali 2021 Updates

fire crackers
'हे नांदेड आहे, पंढरपूर नव्हे दाखवून दिले' : असा लागला निकाल

फटाक्यांद्वारे मोठ्या प्रमाणात हवा, घनकचऱ्याच्या समस्या निर्माण होते. फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकाविरुद्ध असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा मानवी हक्क लक्षात घेऊन वैयक्तिक फटाके फोडण्यापेक्षा प्रशासनाने जी सुरक्षित जागा दिली, त्याठिकाणी सामूहिकरीत्या फटाके फोडावे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे मानवी अवयव फुफ्फूस, डोळे, कान यांना घातक ठरणारे व वायू प्रदूषण करणारे मोठ्या आवाजाचे व रसायनयुक्त फटाके आतषबाजीवर बंदी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे यावेळी पोलिस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी सांगितले. मर्यादित ध्वनी पातळीच्या फटाके विक्रीलाच परवानगी आहे. फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्चित केली आली. ग्रामीण भागातही आमचे पथके तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती अविनाश बारगड (ग्रामीण पोलिस अधीक्षक) यांनी दिली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com