HSC Exam: अहमदनगरच्या श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा

सकाळी १० वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल
HSC Exam
HSC ExamSaam Tv
Published On

अहमदनगर: राज्यामध्ये दहावी (SSC)आणि बारावीच्या (HSC) बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, शनिवारी पार पडलेला केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुंबईच्या (Mumbai) मालाडमध्ये एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा प्रकार समोर आला. यानंतर नगरच्या श्रीगोंद्यात (Shrigonda) देखील गणिताचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Discussion rupture mathematics paper 12th standard in Shrigonda Ahmednagar)

हे देखील पहा-

मालाडमध्ये (Malad) रसायनशास्त्राच्या पेपरबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. संबंधित प्रकार गंभीर असून त्याप्रकरणी एकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत. मात्र, पेपर फुटला नसून प्रश्नपत्रिकेतील काही भाग मोबाईलवर आढळल्याची माहिती त्यांनी दिली आहे. व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिकेमधील काही माहिती समोर आली होती. मालाडच्या एका खासगी क्लासमध्ये हे प्रकरण झाले होते. यानंतर पोलिसांनी एका शिक्षकालाही ताब्यात घेतले आहे.

HSC Exam
शिवनेरी किल्ल्यावर गेलेल्या २०० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

मुंबईच्या मालाडमध्ये कोचिंग क्लासमधील ३ विद्यार्थ्यांना हा पेपर अगोदरच मिळाला होता. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असलेला पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाला. विले पार्ले पोलिसांनी याप्रकरणी यादव नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com