Pandharpur News: 2700 कोटींच्या निधीच्या घोषणेने पंढरपूरच्या बहुचर्चित काॅरिडारचा मार्ग माेकळा?

Pandharpur Vitthal Temple: या विकासाराखड्याचे काम आषाढी यात्रेपासून सुरू होईल अशी आता चर्चा सुरू झाली आहे.
Vitthal Rukmini Pandharpur
Vitthal Rukmini Pandharpursaam tv

Pandharpur News Today: पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबविण्यात येणाऱ्या कॉरिडारची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहर विकास आराखड्यासाठी सुमारे 2700 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या विकासाराखड्याचे काम आषाढी यात्रेपासून सुरू होईल अशी आता चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Vitthal Rukmini Pandharpur
Cyber Crime News: सायबर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

काशी विश्वनाथ मंदिराच्या धरतीवर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसराचा विकास करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मंदिर परिसरातील गर्दी कमी करणे, भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, याबरोबरच मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी मंदिर परिसरात कॉरिडॉरची निर्मिती करण्याचाही संकल्प राज्य सरकारने केला आहे.

मात्र पंढरपुरातील (Pandharpur) कॉरिडारला स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी विरोध केल्यानंतर कॉरिडॉरची संकल्पना काही प्रमाणात मागे पडले आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी पंढरपूर शहर विकास आराखडासठी 2700 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या घोषणानंतर आता पुन्हा पंढरपुरातील कॉरिडारची चर्चा सुरू झाली आहे.

Vitthal Rukmini Pandharpur
Nanded Accident: लग्न सोहळा आटोपून दुचाकीने घरी निघाले; पण वाटेतच मृत्युने गाठलं, भावासमोरच झाला अंत

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या निधी संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडे आली नाही. राज्य सरकारने (State Government) या संदर्भात लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता पंढरपुरातील स्थानिकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com