राजेश भोस्तेकर -
रायगड : आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Elections) स्थानिक कार्यकर्त्यांच्या संमतीने समविचारी पक्षाशी आघाडी करून काँग्रेसला पुन्हा जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत (District President Mahendra Gharat) यांनी कंबर कसली आहे. त्याचबरोबर स्वतःच्या फायद्याकरिता काँग्रेसला फसविण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर दिले जाईल असा इशाराही महेंद्र घरत यांनी दिला आहे. शिवसेनेसोबत जाण्याचे संकेतही यावेळी घरत यांनी दिले आहेत. अलिबाग काँग्रेस (Alibag Congress) भवनमधून पक्षाची धोरण ठरविले जाणार असल्याचेही घरत यांनी म्हटले आहे. (Discussion about forming an alliance with Shiv Sena in the upcoming elections)
हे देखील पहा -
काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे नुकतीच महेंद्र घरत यांनी स्वीकारली. त्यानंतर जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा घेण्यासाठी महेंद्र घरत हे जिल्हा दौरा करीत आहेत. अलिबाग काँग्रेस भवनमध्ये आज मंगळवार 21 सप्टेंबर रोजी तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. त्यानंतर महेंद्र घरत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी करण्याबाबतची भूमिका घरत यांनी स्पष्ट केली.
रायगड जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष होता. मात्र काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा (congress Party) वापर करून इतर पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली आहे. त्यामुळे रायगडात काँग्रेस (Raigad Congress) पक्षाला उतरती कळा आली आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका आगामी निवडणुकीत काय आहे. हे जाणून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत बैठका घेत आहे. समविचारी पक्षाशी आघाडी, युती करताना काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मानही राखला जावा अशी स्पष्ट भूमिका घरत याची आहे. शिवसेनेसोबतही (Shivsena) आघाडी बाबत चर्चा सुरू असल्याचेही घरत यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.