धुळे : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) अध्यक्ष– उपाध्यक्ष निवडीत चुरस पहावयास मिळत आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरे शिवसैनिकांचा (Shiv Sena) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारवर गोंधळ केला असून पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा देत शिवसैनिकांचा राडा केला. (Live Marathi News)
धुळे (Dhule) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे पालकमंत्री (Girish Mahajan) गिरीश महाजन व जिल्ह्यातील (BJP) भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष– उपाध्यक्ष त्यांची नावे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आली. त्यात अश्विनी पवार अध्यक्ष पदासाठी व देवेंद्र पाटील उपाध्यक्ष पदासाठी यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांनी आपले नामांकन दाखल करण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुनिता सोनवणे तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या मोतनबाई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. धुळे जिल्हा परिषदेच्या ऐकून 56 सदस्यांपैकी 36 सदस्य भाजपाचे आहेत; तर 20 सदस्य महाविकास आघाडीचे आहेत.
गोपनीय मतदान घेण्याची मागणी
महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी असले तरी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गोपनीय पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली आहे. गेले अडीच वर्षांमध्ये सत्ताधारी भाजपामध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा महाविकास आघाडीला कुठेतरी फायदा होईल अशी अपेक्षा ठेवत महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेनार आणि त्यांच्या निर्णयाचा फायदा कुणाला होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.