Crime: भयंकर! अल्पवयीन मित्राच्या मारेकऱ्याला 'त्याने' साथीदारांच्या मदतीने संपवले, भरदुपारी घडला थरार

डोळ्यात मिरची पुड टाकून केली हत्‍या; मित्राच्‍या खूनाचा घेतला बदला
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

पिंपरी– चिंचवड : अल्पवयीन मित्राच्‍या खुनाचा बदला घेण्यासाठी मित्राने त्‍या मारेकऱ्याच्‍या डोळ्यात मिरची पुड टाकली. यानंतर कोयत्याने सपासप वार करून खून (Crime) केला. काही वयस्क व अल्पवयीन आरोपींच्या मदतीने कट रचून मित्राने मित्राच्या मारेकराचा खून केला आहे. (Letest Marathi News)

Crime News
MSEDCL: वीज खंडित थकबाकीदारांकडेही लागेल लाईट; महावितरणचा दिलासा

चाकण पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहकल रोडवरील बैलगाडा शर्यत घाटात १० ऑक्टोंबरला दुपारी साडेबारा वाजता ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात (Pimpri Chinchwad) चाकण पोलिसांनी प्रणव उर्फ पन्या संजय शिंदे, आनंदा हनुमंत कोरमशेट्टी, निशान देवेंद्र बोगाटी, कुलदीप संजय जोगदंड, अशोक शंकर चव्हाण आणि अजय अंकुश कांबळे या सहा वयस्क आरोपींना अटक केली आहे. तर दोन- तीन अल्पवयीन आरोपींना देखील चाकण पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

वर्षभर बदल्‍याचा भावना

सदर खुनातील मुख्य आरोपी प्रणव उर्फ पण्या संजय शिंदे याचा मित्र रोहित प्रभू सहानी याचा सप्टेंबर 2021 मध्ये युसुफ अर्शद काकर याने दगडाने ठेचून खून केला होता. मात्र खून करते वेळी युसुफ अर्शद काकर हा अल्पवयीन असल्याने तो काही दिवसातच सुधार गृहातून सुटून बाहेर आला होता. तो ऑटो रिक्षा चालवित होता. मात्र त्याला ऑटो रिक्षा चालकाचे व्यवसाय करत पाहून प्रणव ऊर्फ पण्या शिंदे यांच्या मनात सदैव बदल्याची भावना भडकत होती.

कट रचून बदला

प्रणव शिंदे याने आपल्या इतर सहकारी मित्रांच्या मदतीने युसुफ काकर याचा रोहकल रोडवरील बैलगाडा शर्यत घाटात कट रचून खून केला आहे. या प्रकरणात चाकण पोलिसांनी सहा आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून दोन-तीन अल्पवयीन आरोपींना देखील चाकण पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com