धुळे : गावाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी गावचे सरपंच व उपसरपंचावर असते. मात्र त्यांच्याकडूनच गैरप्रकार होत असल्यास कारवाई केली जात असल्याचे शिरपूर तालुक्यात पाहण्यास मिळाले आहे. सरपंच व उपसरपंचांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण त्यांच्याच अंगलट आले असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांना अपात्र केले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यामध्ये पदावर असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पारदर्शकता आणि सार्वजनिक जागांच्या संरक्षणात शासकीय नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात गावचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सरपंच व उपसरपंचावर असते. असे असतांना सरपंच व उपसरपंच हेच पदाचा गैरवापर करत असल्यास गावकऱ्यांनी जायचे कोठे असा प्रश्न निर्माण होतो. मात्र धुळे जिल्ह्यात पदाचा गैरफायदा घेत शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच व उपसरपंचावर कारवाई झाली आहे.
अतिक्रमण केल्याच्या तक्रारी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बलकुवे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप अशोक पाटील यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच बरोबर अजनाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ सोमा ठेलारी यांनी पदाचा दुरुपयोग करीत सरकारी जागेवर अतिक्रमण व बांधकाम करून शासकीय जागा लाटण्याचा प्रयत्न केल्याची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले अपात्र
दरम्यान तक्रारी दाखल झाल्यानंतर याबाबत चौकशी करून शिरपूर गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बलकुवेचे सरपंच प्रदीप पाटील व अजनाडचे उपसरपंच नवनाथ सोमा ठेलारी यांना सरपंच व उपसरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. अर्थात अतिक्रमण करणे याना चांगलेच महागात पडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.