Bribe Case : मंजूर विहिरीचे लाइन आउटसाठी पैशांची मागणी; कृषी विस्ताराधिकारी एसीबीच्या ताब्यात

Dhule News : सांगवी (ता. शिरपूर) वनक्षेत्रात जमीन आहे. तेथे विहीर खोदण्यासाठी त्याने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २०२२ मध्ये अर्ज केला. विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान मंजूर झाले होते. मात्र विहिरीचे लाइन आउट करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीचा कृषी विस्तार अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे ९ फेब्रुवारीला कारवाई करण्यात आली. योगेशकुमार शांताराम पाटील (वय ४६) असे कृषी विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान तक्रारदार बुडकी (ता. शिरपूर) येथील रहिवासी असून त्याच्या आईच्या नावावर सांगवी (ता. शिरपूर) वनक्षेत्रात जमीन आहे. तेथे विहीर खोदण्यासाठी त्याने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २०२२ मध्ये अर्ज केला होता. त्यात त्याला विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. 

Bribe Case
Raigad Crime : रायगडमध्ये दीड कोटीच्या दरोड्याचा बनाव; दोन पोलिसांचाही सहभाग

लाइन आउटसाठी ५ हजाराची मागणी 

अनुदान मंजूर झाल्यानंतर कृषी विस्ताराधिकारी योगेश पाटील याने सिंचन विहिरीच्या नियोजित जागेची पाहणी करून तक्रारदार व त्याच्या आईचे छायाचित्र काढून नेले होते. यानंतर विहिरीचे लाइन आउट करण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा करत पथकाने बोराडी येथील स्टेट बँक परिसरात सापळा रचला. 

Bribe Case
Bogus Crop Insurance : शासकीय जमिनींवर उतरवला पीक विमा; हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, अन्य जिल्ह्यातील सेवा केंद्रांचा वापर

एसीबीकडून ताब्यात घेत गुन्हा दाखल 

यानंतर कृषी विस्तार अधिकारी योगेशकुमार पाटील याने तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. एसीबीने पाटील यास ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे यांच्या पथकाने केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com