Dhule: दहा दिवसांतच तापमानात साडेसहा अंशांपर्यंत वाढ

दहा दिवसांतच तापमानात साडेसहा अंशांपर्यंत वाढ
Temperature
Temperature Saam tv
Published On

धुळे : गुलाबी थंडी ते गारठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या धुळेकरांना आता उन्हाळ्याने सुरवातीलाच घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा दिवसांचाच विचार केला तर साडेपाच ते साडेसहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. रात्रीच्या तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विशेषतः दुपारच्यावेळी रस्ते, चौकांत तुलनेने वर्दळ कमी झाली आहे. तापमानातील ही वाढ पाहता यंदाचा उन्हाळाही चांगलाच घाम फोडेल अशी चिन्हे आहेत. (dhule news Within ten days the temperature rose to six and a half degrees)

Temperature
संतापजनक! बीडच्या अंबाजोगाईत 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार...

हिवाळ्यात शहरासह जिल्हावासीयांनी थंडीचा जोर अनुभवला. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने, गारपिटीने हजेरी लावल्याने (Dhule News) नुकसानीसह गारठा सहन करावा लागला. आता उन्हाची तीव्रताही दिवसेंदिवस वाढत असल्याने लाही-लाही होत आहे. सकाळी आठ-नऊ नंतरच उन्हाचे चटके बसू लागत आहेत. दुपारी तर उन्हामुळे रस्त्यांवर तुलनेने वर्दळ रोडावल्याचे चित्र पाहायला मिळते. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना टोपी, स्कार्प, छत्री, रुमाल वापरणे भाग पडत आहे. ही तीव्रता आणखी वाढेल अशी चिन्हे आहेत.

पारा दिवसेंदिवस वाढे

गेल्या दहा दिवसांतील तापमान पाहिले तर ३४.५ अंशावर असलेले कमाल तापमान ४१ अंशापर्यंतही पोचल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दहा दिवसांतील हे सर्वाधिक तापमान आहे. त्यानंतर पारा काहीसा खाली आला असला तरी तो ४० पर्यंत स्थिर झाल्याने फार मोठा दिलासा मिळालेला नाही. रात्रीचे तापमानही १४.० ते १८.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे रात्रीही फारकाही दिलासा नाही अशी स्थिती आहे. विशेषतः सिमेंट काँक्रिटच्या घरांमध्ये झळा सोसाव्या लागत आहेत. घराबाहेर थोडा गारवा मिळत असला तरी डासांमुळे घराबाहेर जास्तवेळ थांबता किंवा झोपता येत नाही अशी स्थिती आहे.

गेल्या दहा दिवसांतील तापमान असे

दिवस...कमाल...किमान...आर्द्रता

११ मार्च...३४.५...१४.०... ८५

१२ मार्च...३५.०...१४.०...८६

१३ मार्च...३४.६...११.२...७२

१४ मार्च...३६.०...१३.०...७७

१५ मार्च...३७.०...१७.०...६५

१६ मार्च...३९.०...१८.२...६०

१७ मार्च...४०.०...१५.०...७०

१८ मार्च...४१.०...१५.५...७०

१९ मार्च...४०.५...१७.०...६७

२० मार्च...४०.०...१६.०...७३ टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com