अवकाळी..तब्‍बल १९५ जनावरांचा बळी

अवकाळी..तब्‍बल १९५ जनावरांचा बळी
animal
animal
Published On

धुळे : जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Rain) आणि कमालीचा गारठा वाढला आहे. त्यामुळे साक्री तालुक्यात (Sakri Taluka) दुधाळ लहान १९३, तर मोठ्या दोन, अशा एकूण १९५ जनावरांचा बळी गेला आहे. (dhule-news-Untimely-rain-and-cold-climate-195-animals-were-killed)

animal
एकाच रात्री सात गावात चोरी; मंदिरातील दानपेटी चोरीचाही प्रयत्‍न

धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आधीच थंडीचा कडाका आणि त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये जवळपास १९५ जनावरे दगावली आहेत. साक्री तालुक्यामधील दिघावे, कढरे, गंगापूर, गव्हाणीपाडा या गावांमधील जनावरांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून पावसामुळे वाढलेल्या गारठ्याने या जनावरांचा मृत्यू झाला आहे. दुभती जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दगावलेल्या जनावरांची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावेत व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.

असे झालेय नुकसान

कढरे (ता. साक्री) येथे एका घराचे नुकसान झाले. साक्री तहसील कार्यालयाकडे हानीची माहिती संकलित झाली आहे. गारठा व पावसामुळे दिघावे येथे लहान ११२, गंगापूरला ८, गव्हाणीपाड्याला ७, तामसवाडीला ३१, ऐंचाळेला १०, भागापूरला १५, उभंडला एक, तर देगाव येथे लहान नऊ, तर मोठ्या दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com