खाजगीकरण धोरणा विरोधात कामगार संघटना आक्रमक

खाजगीकरण धोरणा विरोधात कामगार संघटना आक्रमक
खाजगीकरण धोरणा विरोधात कामगार संघटना आक्रमक
Saam tv
Published On

धुळे : केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणा विरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने शेकडो कर्मचाऱ्यांनी आज जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (dhule news Trade unions aggressive against privatization policy)

खाजगीकरण धोरणा विरोधात कामगार संघटना आक्रमक
आखाती देशांमध्ये केळी निर्यात; समाधानकारक दर मिळाल्याने बळीराजा सुखावला

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी तसेच खाजगीकरण धोरणा विरोधामध्ये सर्वत्र संपाची हाक देण्यात आली. धुळ्यात (Dhule) देखील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मागण्यांसाठी व केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात मोर्चा काढला.

धुळे शहरातील कल्याण भवनपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तर पुढे मोर्चा मार्गस्थ होत धुळे शहरातील विविध महत्त्वाच्या चौकांमधून पुढे सरकत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Dhule Collector Office) असलेल्या क्युमाईन क्लबजवळ हा मोर्चा थांबविण्यात आला. त्यानंतर आपल्या मागण्या संदर्भात संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com