आखाती देशांमध्ये केळी निर्यात; समाधानकारक दर मिळाल्याने बळीराजा सुखावला

आखाती देशांमध्ये केळी निर्यात; समाधानकारक दर मिळाल्याने बळीराजा सुखावला
Banana
BananaSaam tv
Published On

नंदुरबार : गेल्या दोन वर्षात कोरोना काळामध्ये केळी, पपई फळबागायतदार शेतकऱ्यांचे गणित पुरते कोलमडले होते. लॉकडाउनचा बहाना देत व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत होते. मात्र आता शहादा (Shahada) तालुक्यातील वडाळी, बामखेडा, जयनगर परिसरातील शेतकऱ्यांनी (Farmer) निर्यातक्षम दर्जेदार केळी उत्पादन करून आखाती देशांमध्ये केळी निर्यातीचा मार्ग गवसल्याने चांगले दर मिळत आहे. (nandurbar news Banana exports to other countries)

Banana
मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात; सर्वसामान्यांसाठी यंदाचे दर मात्र अधिक तिखट

निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी सुरुवातीपासूनच शेतकरी बांधवांना मोठी मेहनत करावी लागते. जास्त उत्पादन क्षमता असलेल्या वाणाची निवड करून योग्य पाण्याचे व खतांचे नियोजन करून मोठ्या मेहनतीने निर्यातक्षम दर्जेदार केळी उत्पादन करून शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी सातासमुद्रापार होत आहे. स्थानिक बाजारपेठ व व्यापारी केळीला देत असलेल्या दरापेक्षा इराण- इराक, वुमान, दुबई या देशातील विविध व्यापारी शहादा तालुक्यातील दर्जेदार केळी खरेदी करत असल्याने येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com