छत्रपती शिवरायांच्या विनापरवानगी उभारलेल्‍या पुतळ्यावरून तणाव

छत्रपती शिवरायांच्या विनापरवानगी उभारलेल्‍या पुतळ्यावरून तणाव
Shivaji Maharaj
Shivaji Maharajsaam tv
Published On

कापडणे (धुळे) : सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्‍लोषात साजरी होत असताना धनूर (ता. धुळे) येथे मात्र महसूल व पोलिस प्रशासनाला अभुतपूर्व पेच प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. धनूर येथे शुक्रवारी मध्‍यरात्रीनंतर ग्रामपंचायतीलगत अश्‍वारूढ छत्रपती शिवरायांचा (Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा अज्ञातांनी उभारला. तो विनापरवानगी असल्‍यामुळे महसुल, पोलिस प्रशासन व ग्रामस्‍थांमध्‍ये पुतळा हटविण्यासंदर्भात शाब्‍दीक ओढाताण सुरू आहे. धनूरमधील महिलांनी मात्र पुतळा हटवू नये यासाठी पुतळ्याभोवती वेढा घातल आंदोलन सुरू केले आहे. (dhule news statue of Chhatrapati Shivaji maharaj without permission dhanur village)

Shivaji Maharaj
Crime: वृद्धाचे शीर केले धडावेगळे..बैल चोरी करण्याचा संशय

धनूर हे तीन हजार (Dhule News) लोकसंख्‍येचे गाव आहे. शेतीवर अर्थकारण असलेल्‍या या गावात शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) मध्‍यरात्रीनंतर काही अज्ञात व्‍यक्‍तींनी अश्‍वारूढ शिवरायांचा पुर्णाकती पुतळा ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी उभारला. हा प्रकार शनिवारी सकाळी महसूल व पोलिस (Police) प्रशासनाच्‍या निदर्शनास आला. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार पुतळा समितीची स्‍थापना व विविध शासकिय परवानगी घेतल्‍यानंतर पुतळा उभारणीला मंजूर दिली जात असते. परंतु धनूर येथे विनापरवानगी छत्रपती शिवारायांचा पुतळा उभारण्यात आला. यामुळे सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्‍ती धोडमीसे, प्रभारी पोलिस अधिक्षक प्रशांत बच्‍छाव यांच्‍यासह महसूल व पोलिस प्रशासनाचा फौजफाटा शनिवारी धनूर येथे दाखल झाला. त्‍यांनी सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांच्‍याशी चर्चा करत विनापरवानगी असलेला शिवरायांचा पुतळा सन्‍मानाने हटवावा अशी सुचना उपस्‍थीत वरिष्‍ठ अधिकारींनी दिली. तसेच सरपंचांना त्‍याबाबत नोटीसही बजावली. चर्चेची फेरी सुरू असताना आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) व जिल्‍हा परिषद सदस्‍य किरण पाटील गावात दाखल झाले.

ग्रामस्‍थांनी पुतळ्याभोवती मांडला ठिय्या

ग्रामस्‍थांना पुतळा हटविण्यासंदर्भात प्रशासकिय पातळीवरून हालचाली सुरू असल्‍याचे समजताच; ग्रामस्‍थ पुतळ्याभोवती जमा झाले. प्रामुख्‍याने महिला वर्ग पुतळ्याच्‍या संरक्षणासाठी पुतळ्याभोवती वेढा टाकत ठिय्या मांडून बसल्‍या. यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली. शनिवारी (१९ फेब्रुवारी) रात्री दहा वाजेपर्यंत सलग ठिय्या आंदोलन सुरू असताना सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांनी सोमवारी ग्रामसभा बोलावून त्‍या पुतळ्याबाबत होणारा निर्णय महसूल व पोलिस प्रशासनाला कळविला जाईल; अशी भुमिका जाहीर केली.

आमदार पाटलांचीही आंदोलनात उडी

असे असताना दोनशेवर पोलिस व आरपीचा ताफा आज (२० फेब्रुवारी) सकाळी धनूर येथे दाखल झाला. ही वार्ता गावात पसरताच महिला वर्ग व ग्रामस्‍थ पुन्‍हा संटीत झाले. त्‍यांनी पुतळ्याला वेढा घालत ठिय्या मांडला. या पाठोपाठ आमदार कुणाल पाटील, जि.प. सदस्‍य किरण पाटील व समर्थकांनी या ठिया आंदोलनात उडी घेतली. त्‍यांनीही पुतळ्याभोवती आंदोलनातून वेढा घातला. यामुळे पोलिसांना पुतळ्यापर्यंत पोहचणे अडचणीचे ठरले. हा वाद सुटणार नसल्‍याचे चिन्‍ह दिसू लागल्‍यानंतर पोलिसांनी आमदार पाटील यांच्‍याशी संवाद सुरू केला. यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी हस्‍तक्षेप करत छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवू नये यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍याशी चर्चा केली जाईल; तोपर्यंत पुतळा हटवू दिला जाणार नाही. अशा भुमिकेतून धनूरच्‍या ग्रामस्‍थांना आश्‍वस्‍थ केले. त्‍यानंतर दुपारी पवणे दोनला जमावाला पांगविण्याची प्रक्रीया सुरू झाली. तोपर्यंत खासदार डॉ. सुभाष भामरेही (Subhash Bhamare) गावात दाखल झाले. त्‍याआधी जिल्‍हा मराठी क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, मराठा संघटनांचे प्रतिनिधी व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले होते. परंतु, ग्रामस्‍थांनी नियमांचे पालन करत सहकार्य करावे असे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com