Crime: वृद्धाचे शीर केले धडावेगळे..बैल चोरी करण्याचा संशय

वृद्धाचे शीर केले धडावेगळे..बैल चोरी करण्याचा संशय
Crime
Crimesaam tv
Published On

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसांपूर्वी शरीरापासून मुंडके अलग करून धक्कादायक पद्धतीने वृद्धाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या खुनाचा छडा लावल्यानंतर जी माहिती पोलीस (Police) प्रशासनातर्फे देण्यात आली ती डोक चक्रावनारी आहे. ज्याचा खून झाला त्यास चोरी (Theft) करण्याचा आजार जडला असल्यामुळे बैल चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयातून त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (dhule news crime news old man's head was cut off Suspicion of stealing bull)

Crime
चुकीच्या पोलिओ डोसमुळे बालिकेचा मृत्यू; वडिलांकडून तक्रार दाखल

‘दे धक्का’ या चित्रपटामध्ये चोरी करण्याचा आजार असल्याने संबंधित व्यक्ती काय काय चोरी करू शकतो हे बघितल आहे. तसाच काहीसा आजार साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर येथील एका वयोवृद्धास जडलेला होता. परंतु या आजारामुळे या वृद्धास आपला जीव गमवावा लागला आहे. वंशा पांडु सोनवणे (वय 60) असे वृद्धाचे नाव आहे.

वादात कुर्‍हाडीने वार

वंशा सोनवणे या वृद्धास आजार जडलेला होता आणि या आजाराच्या धुंदीमध्ये हा व्यक्ती परिसरातील घराबाहेर असलेल्या ज्या ही वस्तू त्याच्या मनास आवडतील त्या चोरी करत असे. ज्या दिवशी त्याचा खून झाला त्या दिवशी देखील तो एका शेतामध्ये जात होता. त्याठिकाणी मारेकर्याने काही दिवसांपूर्वीच एक बैलजोडी विकत घेतलेली होती. आणि ही बैलजोडी चोरी करण्यास वंशा हा आला असावा यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर आपल्या हातात धारदार असलेल्‍या कुर्‍हाडीचे सपासप (Crime News) वार करण्यास विनायक कुवर यांने सुरुवात केली. काही क्षणातच वंशा सोनवणे याचे शिर धडापासून वेगळ झाले. विनायक कुवर याने वंशा सोनवणे याचा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला मृतदेह शेजारी असलेल्या शेतात फरफटत नेऊन टाकून दिला व त्या ठिकाणाहून पळ काढला.

खुनाचा छळा लावत मारेकरी ताब्‍यात

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून तपास देखील सुरू केला. परंतु कुठलाही पुरावा नसल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर या खुनाचा छडा लावण्याच मोठे आव्हान होते. पोलीस प्रशासनातर्फे तपासाची चक्रे वेगाने फिरताच सूत्रांकडून संशयित विनायक नारायण कुवर यांचे नाव समोर आले. पोलिसांनी तात्काळ या संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून या कुणाची कबुली देण्यात आली आहे. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी देखील वंशा सोनवणे हा आपली बैलजोडी चोरी करण्यास आल्याचा संशयातून झालेल्या वादानंतर हा खून केल्याची कबुली मारेकरी विनायक कुवर यांने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com