ब्रश नव्‍हे कापड व हाताच्या बोटांचा ब्रश प्रमाणे वापर; रेखाटले सुंदर चित्र

ब्रश नव्‍हे कापड व हाताच्या बोटांचा ब्रश प्रमाणे वापर; रेखाटले सुंदर चित्र
drawing
drawing
Published On

धुळे : आपण आतापर्यंत ब्रशच्या सहाय्याने केलेल्या पेंटिंग खूप बघितल्‍या आहेत. परंतु कुठल्याही प्रकारचा ब्रशचा वापर न करता कपड्याच्या व हाताच्या बोटांचा ब्रशप्रमाणे वापर करून काढलेले चित्र बघण्याची आपणास देखील उत्सुकता वाटतेच. तर धुळ्यातील अवलिया राजेंद्र भदाणे हे चित्रकार असे चित्र रेखाटत आहेत. (dhule-news-rajendra-bhadane-Brushing-is-the-use-of-cloth-and-fingers-as-a-brush)

धुळ्यातील चित्रकार राजेंद्र भदाणे यांनी हा नवीन प्रयोग करून बघितला आहे. भदाणे यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला असून भदाणे यांनी आतापर्यंत हजारो चित्र ब्रशच्या साह्याने साकारले असून त्यांनी हा प्रयोग प्रथमच करून बघितला आहे.

drawing
विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान

भदाणेंचा नेहमीच वेगळे करण्याचा प्रयत्न

राजेंद्र भदाणे या चित्रकाराने सहा बाय सहाच्या आकाराची भव्य अशी बिना ब्रशने काढलेले निसर्ग चित्र धुळ्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अशा अनोख्या पद्धतीने काढलेले चित्र बघण्यासाठी चित्र प्रेमींची देखील गर्दी होऊ लागली आहे. भदाणे हे नेहमीच चित्रनगरी मध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतात यातूनच हा प्रयोग केला असल्याचे त्यांनी बोलतांना स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com