ईडी चौकशीचा निषेध; धुळ्यात काँग्रेसकडून रास्ता रोको

ईडी चौकशीचा निषेध; धुळ्यात काँग्रेसकडून रास्ता रोको
Congress
CongressSaam tv
Published On

धुळे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. याविरोधात धुळ्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहेत. ईडीच्‍या चौकशी संदर्भात निषेध करत धुळ्यात (Dhule) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. (dhule news Protest of ED inquiry Block the road from Congress in Dhule)

Congress
केळीला विक्रमी भाव; दहा वर्षातील सर्वाधिक दर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 13 जूनपासून ईडी (ED) कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. द्वेषभावनेने केंद्र सरकारकडून दडपशाही सुरु असल्याचा आरोप केला आहे. याचा निषेध करत काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील गांधी पुतळा येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले आहे.

घोषणाबाजी करत रास्‍ता रोको

आंदोलनकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत या आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी रस्ता रोको देखील केला आहे. यावेळी पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com