Dhule: ते पुन्हा येणार! धुळे महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

भाजपकडून महापौरपदासाठी करपेंचा एकमेव अर्ज
Dhule Corporation News
Dhule Corporation NewsSaam tv
Published On

धुळे : धुळे महापालिकेवर पुन्हा एकदा माजी महापौर प्रदीप करपे यांचीच सरशी झाल्याचे बघावयास मिळाले आहे. प्रदीप करपे यांच्या विरोधात कुठलाही अर्ज दाखल न झाल्याने महापौर पदासाठी प्रदीप कर्पे (Pradip Karpe) यांचीच बिनविरोध निवड लगबग निश्चित झाली आहे. (Dhule Corporation News)

Dhule Corporation News
Beed: मुलाच्या आत्महत्येच्‍या आठ दिवसानंतर वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यामुळे धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे यांना आपल्या महापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु त्यानंतर धुळे महापालिकेच्या (Dhule Corporation) महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. अवघ्या सात महिने महापौर पद भोगलेल्या प्रदीप करपे यांच्या नावावरच पुन्हा एकदा भाजपच्या (BJP) पक्षश्रेष्ठतर्फे महापौर पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या संदर्भात भाजपतर्फे फटाके फोडून व पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

करपेंचा एकमेव अर्ज

महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी आज दोन वाजेपर्यंत अखेरची मुदत होती. या दरम्‍यान महापौर पदासाठी भाजपतर्फे पुन्हा एकदा माजी महापौर प्रदीप कर्पे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दोन वाजेच्या अखेरच्या मुदतीपर्यंत दुसरा कुठल्याही उमेदवाराचा अर्ज न आल्यामुळे अखेर माजी महापौर प्रदीप करपे यांचे महापौर पदासाठी नावावर पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब झाला आहे. दुसऱ्या कुणाही उमेदवाराचा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्यामुळे एकमेव अर्ज दाखल झालेल्या प्रदीप करपे यांची महापौर पदासाठी निवड निश्चित झाली असून यासंदर्भात 19 जुलै रोजी निवडणूक अधिकारी त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये महासभेचे आयोजन करून महापौर पदाची निवड प्रक्रियेतील औपचारिकता पार पाडली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com