धुळे : आपली पारंपारिक शेती विकून दुसऱ्या उद्योगांमध्ये आपलं करियर शोधणाऱ्या युवकांना पुन्हा शेती व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रियंका नक्कीच प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला नुसत्याच पुरुषाच्या बरोबरीने चालताना दिसून येत नसून पुरुषांच्या एक पाऊल पुढे देखील जात असल्याचे दिसून येत आहे. (dhule-news-Navdurga-in-Dhule-Priyanka-joshi-work-as-a-topper-is-to-inspire-farmers)
शिक्षणात टॉपर
आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुली डॉक्टर, इंजिनिअर, एअर होस्टेस सारख्या ठिकाणी आपले करिअर करण्याचे स्वप्न रंगवत असतात. परंतु धुळ्यातील १९ वर्षीय प्रियंकाला आपण शिक्षणात टॉपर असून देखील ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर यशस्वी शेतकरीच बनवायचे आहे. या दृष्टीने तिने आपली पावले देखील उचलल्याचे दिसत आहे.
शेतीचे सर्व कामे करते प्रियंका
प्रियंकाने वडिल, काकांच्यासोबत लहानपणापासूनच शालेय शिक्षण घेत असताना शेतीची काम देखील शिकण्यास सुरुवात केली. प्रियंकाला शेतीतील असं कुठलंही काम नाही की ते जमत नाही. निंदणी, खुरपणीपासून तर ट्रॅक्टरने नांगरणीपर्यंत शेतीची सर्वच्या सर्व काम प्रियंका अगदी सहजपणे करते. शेतीची कामं करत असताना एखाद्या गडी माणसाप्रमाणे प्रियांका ट्रॅक्टर चालवत शेतीच्या कामांमध्ये घरच्यांना हातभार लावते. शेतातील सर्वच कामांसाठी आपल्या घरच्यांच्या सोबत खंबीर पणे उभी राहते. वडिलांनी शेतीसह पोल्ट्री फार्मचा देखील व्यवसाय सुरू केला असल्यामुळे पोल्ट्रीमधील बहुतांश काम ही वडिलांच्या विरहित प्रियंका निपटत असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.