तर ज्‍येष्‍ठ नागरीकांना १ जुलैपासून सवलत नाही; स्‍मार्ट कार्ड अनिवार्य

तर ज्‍येष्‍ठ नागरीकांना १ जुलैपासून सवलत नाही; स्‍मार्ट कार्ड अनिवार्य
MSRTC Bus
MSRTC BusSaam Tv
Published On

धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. दरम्यान, स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता ३० जूनपर्यंत (Dhule News) मुदत वाढवण्यात आली आहे. (dhule news msrtc Senior citizens will not get any concession from July)

MSRTC Bus
मध्यरात्रीचा थरार..पतीला दोरीने बांधून डोळ्यादेखत केला महिलेचा खून

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला हातभार लावण्यासाठी (MSRTC Bus) राज्य परिवहन महामंडळाने २०१८-१९ मध्ये सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. ती लागू झाल्यानंतर विनाकार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात येणार नाही असेही महामंडळाने जाहीर केले आहे. कोरोनासह (Corona) विविध कारणांनी या योजनेला मुदतवाढ मिळत गेली. मात्र, यावेळी दिलेली मुदतवाढ अंतिम असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे.

तर १ जुलैपासून सवलत नाही

महामंडळाच्या माध्यमातून साधारण २९ विविध सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू केली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजार असलेले रुग्ण, स्वातंत्र्यसैनिक, विविध पुरस्कारप्राप्त आदींना या सवलतीचा लाभ दिला जातो. दरम्यान, या सवलतीसाठी प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य करण्यात आले आहे. ६५ वर्षावरील नागरिक एसटी (St Bus) सवलतीसाठी पात्र आहेत. या नागरिकांनी एसटीच्या नियमानुसार नोंदणी करून कार्ड घेतल्यास त्यांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येतो. महामंडळाने या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी यापूर्वी ३१ मेपर्यंत मुदत होती. दरम्यान, आता ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असल्याने १ जुलैपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com