Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News: वीज वितरण अधिकाऱ्यांचा गलथान कारभार; नागरिकांनी घातला घेराव

वीज वितरण अधिकाऱ्यांचा गलथान कारभार; नागरिकांनी घातला घेराव
Published on

धुळे : धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 येथील वडजाई रोड परिसरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून वीज वितरण (MSEDCL) विभागाच्या गलथान कारभार सुरू आहे. नागरीकांचे समाधान कर्मचाऱ्यांकडून होत नाही. यामुळे संतप्‍त झालेल्‍या नागरीकांनी आज लोकप्रतिनिधींसमवेत संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातला. (Maharashtra News)

Dhule News
Wardha News: अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा

धुळे (Dhule) शहरातील प्रभाग १९ मध्‍ये दिवसातून आठ ते दहा तास वीज नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात कार्यालयमध्ये (Mahavitaran) कुठलाही अधिकारी वेळेवर हजर राहत नसून कुठल्याही प्रकारे फोन देखील उचलले जात नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली होती. यानंतर प्रभागातील चारही नगरसेवकांनी तसेच परिसरातील नागरिकांतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत या संदर्भातील जाब विचारला आहे.

विजेचा लपंडाव नेहमीच सुरू असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्याचबरोबर विजेवर आधारित व्यवसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. वीर वितरण अधिकाऱ्यांतर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला असून संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत संतप्त नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. यावेळी नागरिकांसह लोकप्रतिनिधी देखील चांगलेच संतापलले बघावयास मिळाले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन संतप्त नागरिकांसह लोकप्रतिनिधींना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com