अगरबत्तीच्या दुकानास आग; लाखोंचे नुकसान

अगरबत्तीच्या दुकानास आग; लाखोंचे नुकसान
Fire
FireSaam tv
Published On

धुळे : धुळे शहरातील गोंदूर रोड परिसरामध्ये असलेल्या अगरबत्तीच्या दुकानात रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे. (dhule news Incense shop fire Loss of millions)

Fire
रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग; केळी बागांचे नुकसान

मध्‍यरात्रीनंतर आग लागल्‍याने (Dhule News) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुर दिसू लागल्याने दुकानात आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित घटनेची माहिती दुकान मालकांना फोनवरून देण्यात आली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाला (Fire Brigade) देखील या संदर्भात माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या पथकास आग आटोक्यात आणण्यात यश आले.

लाखोचे नुकसान

आग आटोक्‍यात येईपर्यंत तोपर्यंत संपूर्ण दुकानातील अगरबत्ती जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे या दुर्घटनेमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसले; तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com