धुळे : पेट्रोल– डिझेलचे भाव आणखी कमी करण्यासाठी भाजपला संपूर्ण देशात हरवावे लागेल; या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नरेंद्र मोदी यांना हरवणे शिवसेना किंवा शरद पवार यांचे काम नाही, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज धुळ्यात लगावला. (dhule-news-impossible-for-Sharad-Pawar-and-Shiv-Sena-to-do-that-Minister-Ramdas-Athavale-statment)
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज (ता. ५) विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच विधान परिषद सदस्य आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल त्यांची भेट यनिमित्ताने ते धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आठवले यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.
ती सहानुभूतीची लाट
गुजरात राज्यातील दादरानगर येथील पोटनिवडणूकीत शिवसेनेचा विजय झाला. याबद्दल बोलताना आठवले म्हणाले, की शिवसेनेच्या सहानुभूतीच्या लाटेत गुजरातमधील शिवसेनेला मिळाले आहे. या यशावर शिवसेनेने भारावून जाऊ नये.
आठवलेंचे भाकित
धुळ्यातील राजकारणावर आठवले म्हणाले, की भाजपचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल हे पुन्हा आमदार होतील. तसेच मी देखील पुन्हा मंत्री होईल; असे भाकीत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.