खानदेशात गोकुळाष्टमी आता ‘कान्हदेश दिन’

खानदेशात गोकुळाष्टमी आता ‘कान्हदेश दिन’
गोकुळाष्टमी
गोकुळाष्टमी
Published On

कापडणे (धुळे) : विविध पुराण कथा, लोककथा, मिथक, पारंपरिक सण, सरकारी गॅझेटियरमधील माहिती आणि स्थलजन्य पुराव्यांवरून खानदेश हा ‘लँड ऑफ कृष्णा’ असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे खानदेश हा भाग खऱ्या अर्थाने ‘कान्हदेश’ आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळातर्फे यापुढे गोकुळाष्टमी हा सण ‘कान्हदेश दिन’ म्हणून साजरा होणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. (dhule-news-Gokulashtami-in-Khandesh-now-celebrate-Kanhadesh-Din)

या संदर्भात मंडळातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की भगवान श्रीकृष्णाने जरासंधासोबत झालेल्या १६ युद्धांत विजय मिळवला होता. जरासंधाने सतराव्या युद्धासाठी मोठी तयारी केली व श्रीकृष्णाला पराभूत केले. कालयवन या भारताबाहेरील राजाला सोबत घेऊन १७ व्या वेळी जरासंधाने पुन्हा मथुरेवर हल्ला केला. आता या युद्धात आपला निभाव लागत नाही. हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने बलराम आणि काही अहिर गवळी लोकांना सोबत घेऊन रणांगातून पळ काढला व थेट खांडव वनातील तापीच्या खोऱ्यात आला.

कान्‍हाचा देश म्हणून ‘कान्हदेश’

तापीच्‍या खोऱ्यात मूळ नाग लोकांची वस्ती होती. या नाग वसाहती हटवून त्यांनी अहिरांच्या वसाहती उभ्या केल्या. या वसाहतीला ‘अहिराणी’ म्हणत. राजा कान्हा याचे नाव दिले. कान्हाचा देश म्हणून हा भाग कान्हदेश होय. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘खानदेश’ हे नाव रुढ झाले. तसेच, कान्हाचे वडील नंदराजा यांच्या नावावरून राजधानी वसविली, तो नंद दरबार. याचा अपभ्रंश नंदुरबार झाला. खानदेशात जे अहिराणी भाषिक लोक आहेत ते सर्व कृष्णाचे वंशज आहेत.

गोकुळाष्टमी
पोस्ट ‘कोविड’च्या रुग्णसंख्येत वाढ; जाणवताय हे विकार

म्हणून कान्हदेश दिन

अशा पार्श्‍वभूमीवर भगवान श्रीकृष्ण खानदेशचा संस्थापक आहे. त्या कान्हाचा जन्म दिवस गोकुळाष्टमी. हा कान्हदेश दिवस म्हणून साजरा करावा, असा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार मंडळाचे प्रधान कार्यालय, केंद्रीय समिती, सर्व विभाग समित्या, उपसमित्यांतर्फे गोकुळाष्टमीला ‘कान्हदेश दिन’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असल्याचे विकास पाटील, प्रदीप अहिरे, एल. आर. पाटील, भानुदास बोराळे, शांताराम पाटील, डॉ. एस. के. पाटील, दीपक पाटील, प्रमोद कुंवर, संजय बिलाले, सुभाष वानखेडे, प्रकाश पाटील, मोहनदास भामरे, भिला पाटील आदींनी कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com