नेटवर्क नसलेल्या भागात मोफत पाठ्यपुस्तक

नेटवर्क नसलेल्या भागात मोफत पाठ्यपुस्तक
नेटवर्क नसलेल्या भागात मोफत पाठ्यपुस्तक
Published On

देऊर (धुळे) : समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांचे बालभारती भांडार ते केंद्रशाळा स्तरापर्यंत लवकरच वितरण होणार आहे. पैकी दुर्गम, अतिदुर्गम, ज्या भागात ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेसे नेटवर्क नाही. ऑफलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्राधान्याने मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण होणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुकानिहाय केंद्रशाळा, महापालिका शाळांना पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. (education-department-Free-textbooks-in-non-networked-areas)

नेटवर्क नसलेल्या भागात मोफत पाठ्यपुस्तक
‘जिल्हाधिकारी साहेब, दाेन दिवस संपुर्ण जिल्हाच बंद ठेवा'

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत यंदा पाठ्यपुस्तके छपाईला अडचण आली आहे. त्यातून बालभारतीने मार्ग काढत पाठ्यपुस्तक वितरणाचे कामकाज सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिरिष कार्गो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्यासोबत करारनामा केला आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क समस्या आहे. त्या गावात कनेक्टिव्हिटी नाही. तेथे पाठ्यपुस्तक वितरण आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात, तर धुळे जिल्ह्यात साक्री, शिरपूर आदी आदिवासी भागात मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन प्राधान्याने राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.

जिल्हानिहाय पाठ्यपुस्तकांची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदवली आहे. गेल्या वर्षी शाळा, केंद्रात शिल्लक पाठ्यपुस्तकांचा वापर करावा. मागणीत तेवढी पुस्तके कमी करावीत. यामुळे इतर शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तक पूर्ण प्राप्त होतील. समप्रमाण राहील. तालुका व शाळास्तरावर पुस्तकांची विभागणी व वितरण करतेवेळी पुस्तकांची बांधणी व छपाई यात दोष आढळून आल्यास अशी पुस्तके प्रथम तालुका स्तरावर संकलित करावीत. जिल्ह्यातील माध्यम, वर्ग, तालुका विषयनिहाय यादी तयार करून प्राथमिक शिक्षणाधिकारी बालभारतीला कळवतील.

नेटवर्क नसलेल्या भागात मोफत पाठ्यपुस्तक
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ; नद्याजोड प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता

केंद्र प्रमुखांच्‍या उपस्थितीत वितरिण

पाठ्यपुस्तक वितरणात बालभारतीचे डेपो मॅनेजर व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, महापालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्यात समन्वय राखून वितरण सुलभ होणार याची दक्षता घ्यावी लागणार आहे. केंद्रशाळेवर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर केंद्रशाळेतून संबंधित शाळांना पाठ्यपुस्तके केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत वितरित करणार आहेत. एकाच दिवशी एकाच वेळी शाळास्तरावर विद्यार्थी, पालकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पाठ्यपुस्तक वितरण करताना केंद्रस्तरावर भेदभाव होऊ नये, यासाठी केंद्रप्रमुखांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे; अन्यथा शिक्षकांमध्ये वादविवाद होतात. वाद थांबावे, ही अपेक्षा आहे.

संच मागणी लाभार्थी संख्या

धुळे : ६१ हजार ४५१

साक्री: ७१ हजार ४५०

शिंदखेडा : ४१ हजार ९०६

शिरपूर : ५९ हजार ६७

एकूण : दोन लाख ३३ हजार ८७४

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com