Dhule Corporation: रजिस्टरच गेट बाहेर धरून तपासला कर्मचाऱ्यांचा टाइमिंग

लेटलतीफ कर्मचाऱ्यांची उपायुक्त व उपमहापौरांनी घेतली हजेरी
Dhule Corporation News
Dhule Corporation NewsSaam tv
Published On

धुळे : धुळे महापालिकेच्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांविरोधात पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर व उपमहापौर अनिल नागमोते आज ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बघावस मिळाले आहे. महापालिकेत नेहमीच लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांची (Dhule News) पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर व उपमहापौर अनिल नागमोते यांनी गेट बाहेरून बंद करत थेट पालिकेच्या बाहेर बसवून आज चांगलीच हजेरी घेतली आहे. (Dhule Corporation News)

Dhule Corporation News
Surat Nagpur Highway: अवजड वाहनांसाठी पुल बंदच; पुरामुळे पुन्हा पुलाचा काही भाग गेला वाहून

धुळे महापालिकेत (Dhule Corporation) कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याच्या नगरिकांतर्फे वारंवार येणाऱ्या तक्रारी होत्‍या. यावरून पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी चक्क रजिस्टरच गेट बाहेर धरून बसत प्रत्येक कर्मचाऱ्यांचा रोजच्‍या कामावर येण्याचा टाइमिंग तपासला. कर्मचाऱ्यांची तीन वेळा उशिरा इंट्री झाली असेल तर त्यांच्यावर हाफ डे लावत कारवाई करण्यात येणार आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांची रोजच लेट एंट्री होत असेल अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर व महानगरपालिका उपमहापौर अनिल नागमोते यांनी स्पष्ट केले आहे.

नागरीकांना दिलासा मिळणार का?

महापालिका उपायुक्त व उपमहापौर यांनी आज लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदळ उडवली. उपायुक्त व उपमहापौरांनी आज घेतलेल्या हजेरीमुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार काहीसा कमी होत महानगरपालिकेत अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com