नंदुरबार : नागपूर– सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला. यानंतर गेल्या 24 तासात ठेकेदाराकडून माती (Surat Nagpur Highway) टाकून दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु बुधवारी संध्याकाळी झालेल्या (Rain) पावसाच्या पुरामुळे पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंदच आहे. (nandurbar news Surat Nagpur Highway Bridge closed for heavy vehicles)
विसरवाडी गावाचा आज आठवडी बाजार असल्याने खेडेगावातून येणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वारांना पुलावरून प्रवेश दिला जात आहे. मात्र गेल्या पाच दिवसांपासून (Navapur) नवापूर तालुक्यात झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे महामार्ग पूल तसेच अनेक गावांचे फरशी पूल तुटून दळणवळणाचा प्रश्न उद्भवल्याने आठवडी बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. विसरवाडी येथील आठवडी बाजार ग्राहकांना अभावी ओस पडला आहे. पावसाने विश्रांती घेतली असून महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे (Nandurbar News) पंचनामे करावे. तसेच बांधकाम विभागाने सबंधित गावांचे नांदुरुस्त फरशी पूल लवकर दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अन् टाकलेली माती पुन्हा वाहून गेली
पुराचा प्रवाह कमी झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तात्पुरता कच्चा पूल दुरुस्तीसाठी ठेकेदाराद्वारे युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. महामार्गाची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाते. मात्र पावसाच्या पुरामुळे पुन्हा पूल वाहून जात असल्याने सर्वांसाठीच महामार्ग डोकेदुखी ठरत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.