Dhule News: कोरोना पुन्हा पाय पसरवतोय; बारा दिवसात दीडशे नवीन पॉझिटिव्ह

कोरोना पुन्हा पाय पसरवतोय; बारा दिवसात दीडशे नवीन पॉझिटिव्ह
Dhule Corona Dhule Corona Update News
Dhule Corona Dhule Corona Update NewsSaam tv

धुळे : साधारण दोन वर्ष कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जिल्हावासीयही अक्षरशः हैराण झाले. मागील चार महिन्यांपासून कोरोनाचे हे संकट दूर गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Corona) पुन्हा आढळून येत असल्याने हे संकट पुन्हा येतेय की काय अशी शंका निर्माण झाली आहे. बुधवारी (ता.१३) देखील जिल्ह्यात नवीन २१ कोरोनाबाधित आढळून आले. गेल्या बारा दिवसात जिल्ह्यात नवीन १५२ कोरोना आढळून आले आहेत. बाधितांची ही वाढती संख्या पाहता नागरिकांनी पुन्हा एकदा दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. (Dhule Corona Update News)

Dhule Corona Dhule Corona Update News
Dhule Corporation: रजिस्टरच गेट बाहेर धरून तपासला कर्मचाऱ्यांचा टाइमिंग

कोविड-१९ विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हैराण झाले. मोठ्या प्रमाणावर लोकांचा बळी गेला. आर्थिक स्थिती खिळखिळी झाली. धुळे (Dhule) जिल्हावासीयदेखील कोरोनाच्या या संकटाने अक्षरशः बेजार झाले. या संकटाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६७६ जणांचा बळी घेतला. कोरोनाचे (CoronaVirus) हे संकट पुन्हा येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा आहे. मार्चमध्ये जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर स्थिती रुळावर आली. सर्व व्यवहार, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये पूर्ववत सुरू झाले. कोरोनामुळे लागलेले बहुतांश निर्बंधही हटले. त्यामुळे सर्व जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाबाधित आढळून येत असल्याने धाकधूक वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या बारा दिवसातच जिल्ह्यात नवीन १५२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या नवीन बाधितांबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५१ हजार १७४ झाली आहे.

बुधवारी २१ बाधित

बुधवारी (ता.१३) दुपारी साडेचारपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नवीन २१ कोरोनाबाधित आढळून आले. बुधवारची स्थिती अशी ः जिल्हा रुग्णालय- ४३ पैकी सहा यात सोनगीर पोलीस स्टेशन-१, नवजीवन नगर-१, साक्री रोड धुळे-१, चाळीसगाव रोड धुळे-१, प्रोफेसर कॉलनी देवपूर धुळे-१, इतर-१. शिंदखेडा तालुका-१८८ पैकी सहा. यात कामपूर-२, जोगशेलू-१, चौगाव बुद्रूक-१, विखरण-१, आश्रम शाळा विखरण-१. मनपा कोविड केअर सेंटर- ५५ पैकी सहा. यात लक्ष्मी नगर-१, तुळशीराम नगर-१, सुभाष नगर-२, मनमाड जीन-१, पोलीस प्रशिक्षण केंद्र-१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- सहा पैकी तीन. यात धुळे-२, जळगाव-१.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com