धुळे : आगामी जून– जुलै महिन्यामध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. परंतु असे असताना देखील धुळेकर मात्र कोरोना संदर्भात गांभीर्याने नसल्याचे दिसून येत आहे. कारण कोरोनाचा (Corona) दुसरा डोस अद्यापही 40 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी घेतला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. (dhule news Citizens turn their backs to take a second dose of corona vaccine)
कोरोनामुळे बहुतांश नागरिकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यानंतर आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला सुरुवातीला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील दिला. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आता लसीकरण करण्यासाठी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
सुरुवातीला कोरोनाचा पहिला डोस (Dhule News) झाल्यानंतर आता दुसरा डोस घेणे आवश्यक असताना जवळपास 40 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतलाच नसल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आगामी कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोनाचा दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.