Bribe
BribeSaam tv

शेतात वीज जोडणीसाठी लाच; वायरमनसह खाजगी वायरमन एसीबीच्या जाळ्यात

शेतात वीज जोडणीसाठी लाच; वायरमनसह खाजगी वायरमन एसीबीच्या जाळ्यात
Published on

नंदुरबार : नंदूरबार येथील एकाच्या भोणे शिवारातील शेतात वीज कनेक्शन घेण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून याप्रकरणी वीज वितरण (MSEDCL) विभागाच्या वायरमनला ही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule news Bribe for electricity connection in the field)

Bribe
तर ज्‍येष्‍ठ नागरीकांना १ जुलैपासून सवलत नाही; स्‍मार्ट कार्ड अनिवार्य

तक्रारदाराच्या भोणे (ता.नंदूरबार) शिवारात शेत असून शेतात वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्याने तकारदार यांनी एमएसईबी कार्यालय, नंदुरबार येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये डिमांड नोट मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार एमएसईबी कार्यालयाशी संपर्क साधला असता वायरमन अनिल मांगडू भोये यांनी खाजगी वायरमन देवा मराठे यांच्या मार्फत ३० हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपये त्यात १५ हजार रुपये डिमांड नोट व १२ हजार ५०० रुपये लाचेची (Bribe) मागणी केली.

दोघे ताब्‍यात

दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. खाजगी वायरमन देवा मराठे यांनी २७ हजार ५०० रुपये पंच साक्षीदारांसमोर स्वीकारले. याप्रकरणी खाजगी वायरमन देवानंद ऊर्फ देवा पंडित मराठे, व म.रा.वि.वि. कंपनीचे वायरमन अनिल मांगडु भोये यांना ताब्यात घेण्यात आले. सदर कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी एस. वाघ, पोहवा विजय ठाकरे, पोना/अमोल मराठे, पोना देवराम गावीत, अँन्टी करप्शन ब्युरो नंदुरबार पथकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com