Dhule: मंत्री मलिकांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन; भाजपतर्फे राजीनाम्याची मागणी

मंत्री मलिकांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन; भाजपतर्फे राजीनाम्याची मागणी
Dhule
DhuleSaam tv
Published On

धुळे : महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांचा अंडरवर्ल्ड दाउदशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांना ईडीने अटक केली. सरकारने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा; अशी मागणी करत भाजप धुळे (Dhule) महानगरतर्फे आज मालिकांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. (dhule news BJP shoe throwing movement in the image of Minister nawab Malik)

Dhule
गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना गावठी पिस्तूलासह केले जेलबंद

भाजपच्या (BJP) आंदोलकांनी मलिकांच्या विरोधात व महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनामा घेतला जात नाही; तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपातर्फे राज्यभरात आंदोलने सुरु राहतील, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com