धुळे : ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी सातत्याने गैरहजर राहतो. यामुळे गावातील विकास कामे वेळेवर करता येत नाहीत. शिवाय ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करत असून या कारभाराला कंटाळून संतप्त ग्रामस्थांनी आज धुळ्याच्या मांडळ ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकून संताप व्यक्त केला आहे, यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
धुळे तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत ही शहरालगत लागून असल्याने काही ना काही कामानिमित्त ग्रामस्थांची सतत वर्दळ असते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच मांडळ ग्रामपंचायतीला नियुक्त झालेले ग्रामविकास अधिकारी हे मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत. तसेच ३० डिसेंबर २०२४ पासून ते सतत कार्यालयात गैरहजर राहत असल्याचे गावातील नागरिकांचे कामे देखील रखडलेली आहे. कामांसाठी फेऱ्या माराव्या लागत असून देखील कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
बीडीओ दखल घेत नसल्याचा आरोप
ग्रामविकास अधिकाऱ्याचा वारंवार होत असलेल्या मनमानी कारभार बाबत ग्रामस्थांनी बीडीओ अधिकाऱ्यांना अनेक वेळा याबाबत तक्रार केली आहे. तरी देखील बिडीओकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या या कारभाराला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच देखील त्रासले आहेत.
अखेर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
सरपंच, उपसरपंच तसेच पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थांनी वेळेवर कामे होत नसल्याने ग्रामविकास अधिकारी मुकेश बेलदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून मांडळ ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप हतोकले आहे. तसेच नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत कार्यालय उघडण्यात येणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.