80 किलोमीटरची पायपीट..आदिवासी शेतकरी पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयावर

80 किलोमीटरची पायपीट..आदिवासी शेतकरी पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयावर
Farmer
FarmerSaam tv
Published On

धुळे : वनजमिनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाने सातबारा उतारा द्यावा; या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून निघालेला आदिवासी बांधवांचा मोर्चा आज धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. (dhule news 80 km long march Tribal farmers reached the Collector office)

Farmer
राज्‍यपालांचा ताफा येण्यापुर्वी कार्यकर्ते ताब्‍यात; राष्‍ट्रवादीकडून निषेध

वनजमिनी आदिवासींच्या नावावर करण्याचा कायदा गेली 14 वर्ष होऊन देखील अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे आदिवासी बांधवांना आपल्या वनजमिनींचा सातबारा उतारा या शेतकऱ्यांना (Farmer) अद्याप मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर वन जमिनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांना सातबारा उतारा देण्यात यावा; या प्रमुख मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांगवी येथून रविवारी मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. रणरणत्या उन्हात आदिवासी शेतकरी बांधव लॉंग मार्चच्या माध्यमातून आज हा मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारो आदिवासी बांधव आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सहभागी झाले होते.

शहरात पोलीस बंदोबस्त

शहराच्या विविध भागातून मार्गस्थ झालेला हा मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील क्यूमाईन क्लब येथे मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हिरालाल परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com