Dhule News: अवघ्या ६ महिन्याच्या चिमुरड्यानं नोंदवलं कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव; काय केलाय विक्रम?

Dhule Kalam World Record: धुळे शहरातील वैभव अनिल सोनार यांच्या अवघ्या ६ महिन्यांचा मुलगा वेदांश सोनार या चिमुकल्याची स्मरणशक्ती पाहून त्याला हा कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड जाहीर करण्यात आलाय.
Kalam World Record dhule
Six Month Old Baby Kalam World RecordRNO
Published On

RNO

Six Month Old Baby Registered Kalam World Record :

धुळ्यातील सहा महिन्याच्या मुलाची स्मरणशक्ती पाहून त्याला पुरस्कार घोषित करण्यात आलाय. शहरातील वैभव अनिल सोनार यांच्या अवघ्या ६ महिन्यांचा मुलगा वेदांश सोनार या चिमुकल्याची स्मरणशक्ती पाहून त्याला हा कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड जाहीर करण्यात आलाय. (Latest News)

सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. पुस्तकी अभ्यासपासून ते दूर होत आहेत. याबाबत अनेक अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जाते. या गोष्टींना अपवाद ठरत धुळे शहरातील सोनार कुटुंबीयांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखऊन ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या ६ महिन्यांच्या वेदांश सोनारने या वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली असू त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड मंजूर झालाय. धुळ्यातून सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

Dhule Kalam World Record
Dhule Kalam World Record

वेदांशचे आई आणि वडील यांना लक्षात आले की, वेदांशला एखादी गोष्ट दाखवली की ती गोष्ट सहज त्याच्या लक्षात राहते. त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे वेदांशने त्या सहजपणे आत्मसात केल्या. वेदांशच्या पालकांनी त्याला एबीसीडी, विविध मुळाक्षरे, १६ हून अधिक देशांचे राष्ट्रध्वज, प्राण्यांची नावे, फळे, फुलांची नावे, पक्षी, भाज्या विविध रंग, १ ते २० पर्यंतचे नंबर, महापुरुषांच्या माहिती हे सर्व त्याला सांगितले. वेदांश हे सर्व काही क्षणातच स्मरणात ठेवले. त्यामुळे पालकांना त्याचे खूप कुतूहल वाटले. टीव्ही आणि मोबाईलपासून मुलांना दूर ठेवल्यास त्यांच्या सुप्त गुणांचा माग घेता येईल, अशी आशा वेदांशच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.

चांगली स्मरणशक्ती असलेल्या चिमुकल्या मुलांसाठी कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड दिला जातो, अशी माहिती वेदांशच्या पालकांना मिळाली. त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी नामांकन भरले. त्यावेळी त्यांना वेदांशचे विडिओ देण्याबाबत सांगण्यात आले. त्यांनी वेदांशला महापुरुषांचे फोटो, भाज्यांचे प्रकार, विविध देशांचे झेंडे ओळखतानाचे व्हिडिओ चित्रित करून पाठवले. वेदांशची तल्लखबुद्धी पाहता त्याचे नामांकन स्वीकारत अवघ्या 6 महिन्यांच्या असलेल्या वेदांश सोनार या चिमुकल्याची नोंद कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात अली असल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी यावेळी दिली.

Kalam World Record dhule
Parenting Tips : पालकांनो, उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? या चुका करणे टाळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com