धुळे : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेल्या एसटी महामंडळाच्या धुळे विभागात आतापर्यंत ४७ बस सेवेत दाखल झाल्या आहेत. तसेच ६२५ कर्मचाऱ्यांनी पूर्ववत सेवा सुरू केल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. (dhule news 47 buses started in Dhule division 625 employees admitted)
धुळे (Dhule) विभागात एकूण ७४८ बस आहेत. पैकी ४७ सेवेत दाखल झाल्या आहेत. महामंडळाचे या विभागात एकूण ३ हजार ६९२ कर्मचारी आहेत. पैकी १ हजार ३७६ चालक, १ हजार ३०१ वाहक आहेत. असे असताना विविध मागण्यांसाठी दिवाळीपासून (Diwali) सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात येथील २ हजार ७३९ कर्मचारी सहभागी आहेत. सेवेत ४५ चालक, तर ४९ वाहक दाखल झाले असून, उर्वरित आंदोलनात (St Strike) सक्रिय आहेत.
नंदुरबार, जळगावसाठी आठ फेऱ्या
धुळे शहरातील मुख्य आगारात गुरुवारी सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना हजर करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून काही बस सेवेत आणण्यात आल्या व त्यांनी धुळे, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात ठिकठिकाणी व जळगाव (Jalgaon) येथेही मिळून एकूण आठ फेऱ्या केल्या. आगारात काही बस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणताना आंदोलक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळे गोंधळ उडाला. त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात आणि जमावबंदी, गर्दी टाळण्याचा आदेश असताना, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालू नये, अशी समज पोलिसांनी दिली. नंतर स्थिती पूर्वपदावर आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.