धुळ्यात ११८ नागरीक आले परदेशातून; ८८ जणांशी संपर्क

धुळ्यात ११८ नागरीक आले परदेशातून; ८८ जणांशी संपर्क
omicron
omicron
Published On: 

धुळे : कोरोनाचा नवीन व्‍हेरीयंट ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे परदेशातून येत असलेल्‍यांची तपासणी केली जात आहे. यात धुळे (Dhule) जिल्‍ह्यात परदेशातून आलेल्या ११८ नागरिकांपैकी ८८ नागरिकांचा संपर्क झाला आहे. उर्वरितांचा प्रशासनातर्फे शोध घेण्यात येत आहे. (dhule-news-118-citizens-came-to-Dhule-from-abroad-Contact-with-88-people)

omicron
बापाचे छत्र हरपले..पण लग्‍न मंडपात मृत वडीलांचा पुतळा उभारून आशीर्वाद

ओमायक्रॉन या कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधून कोरोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये आज अखेरपर्यंत ११८ नागरिक परदेशातून आले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली असून यापैकी जवळपास ८८ नागरिकांशी प्रशासनातर्फे संपर्क करण्यात आला आहे. त्यापैकी ७१ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे.

पॉझिटीव्‍ह अहवाल नाही

परदेशातून धुळ्यात आलेल्या उर्वरित ३० नागरिकांचा युद्धपातळीवर प्रशासनातर्फे शोध घेण्यात येत आहे. अद्यापपर्यंत परदेशातून आलेल्या कुठल्याही नागरिकाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याचे आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी विशाल पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.