कचरा गाडीत वाहिली जात होती माती! धुळ्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस
कचरा गाडीत वाहिली जात होती माती! धुळ्यातील धक्कादायक प्रकार उघडकीसभुषण अहिरे

कचरा गाडीत वाहिली जात होती माती! धुळ्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

ल्या काही दिवसांपासून धुळे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये कचऱ्याचा मुद्दा विरोधकांतर्फे चांगलाच उचलून धरण्यात आला आहे.
Published on

भुषण अहिरे

धुळे: गेल्या काही दिवसांपासून धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Muncipal Corporation) महासभेमध्ये कचऱ्याचा मुद्दा विरोधकांतर्फे चांगलाच उचलून धरण्यात आला आहे. धुळे शहरातील वार्ड क्रमांक 19 मध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येतच नसल्याचा आरोप नागरिकांतर्फे लावण्यात आला आहे.

वार्ड क्रमांक एकोणवीसच्या बाहेर घंटागाडी चालक व कर्मचारी हे घंटागाडी मध्ये परिसरातील कचरा जमा न करता घंटागाडी मध्ये माती भरून नेत असताना परिसरातील नागरिकांनी व स्थानिक नगरसेवकांनी हा सर्व प्रकार डोळ्यांनी बघितला. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर पकडून त्यास महानगरपालिका प्रवेश द्वारावर आणून ट्रॅक्टर मध्ये असलेली माती महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच टाकण्यात आली आहे.

कचरा गाडीत वाहिली जात होती माती! धुळ्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस
चक्क! पुण्यातील ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; कारण काय? वाचा सविस्तर

कचरा कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभारामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य वाढले असल्याचा आरोप स्थानिकांनी लावला आहे. या घंटागाडीमध्ये कचरा ऐवजी माती भरून वजन वाढविले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व नगरसेवकांनी लावला असून या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com