धुळे आगाराला रोज मिळू लागले वीस लाखांचे उत्पन्न

धुळे आगाराला रोज मिळू लागले वीस लाखांचे उत्पन्न
St Bus
St BusSaam tv
Published On

धुळे : एसटी महामंडळाच्या धुळे आगारातून बससेवा आता पूर्वपदावर येत आहे. आगारातून एसटीच्या रोज ३४७ फेऱ्या होत आहेत. रोज ४५ ते ५० हजार किलोमीटर बस (St Bus) प्रवासातून १८ ते २० लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असल्याची माहिती आगारप्रमुख अनुजा दुसाने यांनी दिली. (Dhule Depot started earning Rs 20 lakhs daily)

St Bus
‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही : शिवसेना

एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यभर २८ नोव्हेंबरपासून बेमुदत संप (St Strike) केला होता. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. संप मिटावा व सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडविल्या. मात्र, शासकीयसेवेत विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम होते. त्यामुळे त्यांनी संप सुरूच ठेवला होता. अखेर या मागणीसाठी आयोग स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार आयोगाची नियुक्ती झाली. त्यानंतर आयोगानेदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेतील विलिनीकरणाला नकार दिला. तसा अहवाल न्यायालयात सादर झाला. न्यायालयाने आयोगाच्या अहवालाची दखल घेत कर्मचाऱ्यांना (Dhule News) कामावर हजर होण्याचा आदेश दिला. अखेर एसटी कर्मचारीही २४ एप्रिलपासून कामावर हजर झाले. त्यामुळे आता बससेवा पूर्वपदावर येत आहे. आगारातून रोज ३४७ फेऱ्या होत आहेत. ४५ ते ५० हजार किलोमीटरच्या प्रवासातून धुळे आगाराला रोज २० लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

सोळा ठिकाणी बसेस मुक्कामी

धुळे आगारातून पुण्यासाठी रोज अकरा फेऱ्या होत आहेत. नाशिकसाठी वीस बसेस रोज धावत आहेत. पहाटे साडेपाच वाजता नंदुरबार, अक्कलकुवा मार्गे अहमदाबादसाठी बससेवा सुरू केली आहे. सुरत, वापी बसेस नियमित सोडल्या जात आहेत. धुळे ते खुंटामोडी बस सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सोळा ठिकाणी बसेस मुक्कामी थांबत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com