Dhule Crime : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; मालेगावातून दोघे ताब्यात

Dhule News :
Dhule Crime
Dhule Crime Saam tv
Published On

धुळे : धुळे शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना चाळीसगाव रोड पोलिसांनी मालेगावमधून ताब्यात घेतले आहेत. तसेच त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. 

धुळ्याच्या (Dhule) चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वी दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली होती. या दरम्यान दुचाकी चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेत चोरीची (Bike Theft) उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यात दुचाकी चोरी करणारे चोरटे आढळून आले.

Dhule Crime
Parbhani News : गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू डीजेमुळे नाही; पोलीस अधीक्षकांनी सांगितले खरे कारण

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या दुचाकी चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी मालेगाव येथून दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून दोन दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाई चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com